भुसावळ – युवा सेना विभागीय सचिव अविष्कार भुसे यांचे वरणगाव शिवसेना- युवा सेनेतर्फे बस स्टॅन्ड चौकात मंगळवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले.

युवा सेना उत्तर महाराष्ट्रचे विभागीय सचिव तथा कृषी मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसे हे मुक्ताईनगरला युवा सेनेच्या कार्यक्रमानिमित्त जात असताना वरणगाव बस स्टॅन्ड चौकात शिवसेना शहर आणि युवा सेनेतर्फे फटाके फोडून भुसे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाला अविष्कार भुसे यांनी भेट देऊन जिल्हाप्रमुख समाधान महाजन, शहरप्रमुख संतोष माळी, निलेश ठाकूर, युवा जिल्हाधिकारी चंद्रकांत शर्मा यांनी शाल श्रीफळ देऊन भुसे यांचा सत्कार केला.
युवा सेनेचे मनोज कावडीया, शिवराज पाटील, विश्वजीत पाटील, शंतनू नारखेडे यांचाही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागतपर सत्कार केला. याप्रसंगी शिवसेना – युवा सेनेच्या संघटना विषयी चर्चा करण्यात आली. आगामी नगरपरिषद निवडणुकीचा आढावा घेऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी आविष्कारजी भुसे यांनी दिले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख समाधान महाजन, युवासेना जिल्हाधिकारी चंद्रकांत शर्मा, वरणगाव शहर प्रमुख संतोष माळी, निलेश ठाकूर, शेख सईद मुल्लाजी, सुरेश चौधरी, उपशहर प्रमुख कालू शर्मा, आबा सोनार, बाळू माळी, निलेश काळे, विलास वंजारी, सुनील देवघाटोळे, अतुल पाटील, कृष्णा पाटील, नंदकिशोर माळी, दिपक शेडके, वैभव लोखंडे, किरण माळी यांच्यासह शिवसैनिक तथा युवासेना सैनिक उपस्थित होते.


