भुसावळात पापा नगर भागात अवैध दारू विक्री बंद करावी – नागरिकांचे निवेदन ;

भुसावळ प्रतिनिधी – सध्या मुस्लिम समाजाचे रमजान पवित्र महिन्याला सुरुवात झालेली आहे.सर्वत्र अगदी पवित्र वातावरण असून रोजे उपवास सुरू आहे.

सदर पापा नगर झोपडपट्टी मध्ये अवैध रित्या प्लास्टिक पिशवी मध्ये अवैध दारू विक्री सुरू आहे.दारू पिऊन झिंगत येणारे दारूडे शिवीगाळ करीत आहेत.सदर दारू विक्रेत्याला जर कोणी विरोध केला तर पती- पत्नी अरेरावी करून हाणामारी करतात.अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी बरेच वेळा गुन्हे दाखल केले आहे.पण त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही.अवैध दारू विक्रेत्यांमुळे वार्डातील अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे.वार्डातील महिलांनी आपली व्यथा माजी नगरसेविका रशिदा बी शेख पापा यांच्याकडे मांडली.

या अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करन्यासाठी वार्डातील महिलांच्या वतीने बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड यांना निवेदन देण्यात आले आहे