भुसावळात पालकमंत्री यांच्या उपस्थितीत रेल कामगार सेनेतर्फे विविध कार्यक्रमांनी साजरी होणार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ;


भुसावळ – छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त उद्या मंगळवार 5 एप्रिल रोजी सकाळी 11 वा रेल कामगार सेना एमओएच येथे भुसावळ मंडळातर्फे मोठ्या जल्लोषात व धूम धडाक्यात साजरी करण्यात येणार आहे
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना आमदार, खान्देशची मुलुख मैदान तोफ जळगाव जिल्हा पालकमंत्री मा.ना.गुलाबराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत.तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी , युनियन प्रतिनिधी सुध्दा हजर राहणार आहेत

या वेळेस प्रतिमा पूजन , क्रिकेट टुर्नामेंट मधील विजयी संघाचा शिल्ड देवून सत्कार ,तसेच शिवरायांचा दुग्धाभिषेक , पुष्पाभिषेक , शाखा नामफलकाचे अनावरण ,सी अँड डब्ल्यू विभागात मोठी आग विझवणाऱ्या सिव्हिल डिफेन्सचे स्वयंसेवक यांचा सत्कार सुध्दा पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील यांचे हस्ते होणार आहे.
तरी रेल कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते , सर्व कामगार बंधू – भगिनी , शुभचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन रेल कामगार सेने तर्फे रेल कामगार मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा यांनी केले आहे .