भुसावळ – तालुक्यातील खडका विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत गुरुवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 13 जागांसाठी 30जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणूकीमुळे गावातील राजकिय वातावरण तापले आहे. निवडणूकीत पॅनल ऐवजी वैयक्तीक लढत होत असल्याने ही निवडणूक तालुक्यात रंगतदार ठरणार आहे.खडका विकासो निवडणूकीत सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी या मतदार संघात आठ जागा असून त्यात सर्वाधिक १९ अर्ज भरले गेले आहेत. महिला राखीव दोन जागांसाठी चार अर्ज प्राप्त झाल्याने या मतदार संघात सरळ लढतीचे चित्र आहे. इतर मागासगर्वीय एका जागेसाठी चार अर्ज दाखल झाले आहेत. या मतदार संघात माजी सरपंच चुडामण भोळे व शेतकी संघाचे माजी चेअरमन गजानन सरोदे यांच्याच काट््याची लढत होण्याचा अंदाज आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विमाप्र या मतदार संघात एका जागेसाठी दोन अर्ज आले आहेत. या मतदार संघात सरळ लढतीची शक्यता आहे. गुरुवारी निवडणूक अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 13 जागांसाठी 30 अर्ज दाखल झाले असले तरी माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणूकीत 282 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. गावात अंत्यत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणूकीत प्रस्तापितांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. 17 एप्रिल रोजी मतदान होणार असून प्रचारासाठी तब्बल महिन्याभराचा वेळ असल्याने निवडणूक रंगतदार ठरणार आहे.

एक जागा बिनविरोध
खडका विकासोत अनूसूचित जाती जमातीसाठी मतदार संघातील एका जागेसाठी विद्यमान व्हाईस चेअरमन सुरेश संपत सपकाळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. यामुळे ही जागा बिनविरोध झाली आहे. मात्र अर्ज छाननी नंतर याबाबत अधिकृत घोषणा होईल


