कॉपी आढळलेल्या शाळेची तत्काळ मान्यता होणार रद्द : शालेय शिक्षणमंत्र्यांची घोषणा –


मुंबई : कॉपी पुरवण्याचे प्रकार आढळल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल आणि पुढे अशा शाळांना दहावीचे परीक्षा केंद्र दिले जाणार नाही, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी विधान परीषदेत केली.

गैरप्रकारानंतर शिक्षण विभाग रडारवर
दहावी आणि बारावी परीक्षेचे फुटलेले पेपर आणि कॉपीचे प्रकार उघडकीस येत असून प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, याविषयीचा मुद्दा काँग्रेसचे जयंत आसगावकर यांनी उपस्थित केला होता. त्यावर मंत्री गायकवाड म्हणाल्या की, दहावीच्या मराठी विषयाच्या परीक्षेदरम्यान पैठण तालुक्यातील निलजगाव येथील लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक, सहशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवीत असल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.