भुसावळ – शहरातील ग्रीन पार्क भागात एका इसामांकडे राहत्या घरात तलवार असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक यांना मिळल्यावरून घटनास्थळी पोलीस पथक रवाना होऊन भुसावळातील ग्रीन पार्क मधून तलवार जप्त करण्यात आली आहे.
,फिर्यादी पोकॉ जावेद शहा हकीम शहा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशन चे निरीक्षक राहुल गायकवाड यांना बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की भुसावळ शहरातील ग्रीन पार्क भागातील हाजीमोद्दीन रिसामोद्दीन शेख यांच्या राहत्या घरात तलवार आहे.त्या मिळालेल्या माहितीची खात्री केल्यानंतर त्यांनी स.फौ.शरीफोद्दीन काझी ,पोहेकॉ विजय नेरकर,सचिन पोळ,महिला पोलीस वैशाली सोनवणे अशांना घटनास्थळी पाठवून आरोपीला विश्वासात घेतले असता आरोपीने सदर तलवार राहत्या घरातून काढून दिली म्हणून आरोपी विरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बा पो.स्टे चे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशावरून गुरुन १७५/२०२२ भा.द.वि. कलम ४/२५ व मुंबई पोलीस अधिनियम ३७(१)(३) चे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच एक लोखंडी तलवार आरोपिकडून जप्त करण्यात आली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ विजय नेरकर करीत आहे



