भुसावळ – जम्मू-काश्मीर वर आधारित अनेक चित्रपट आजपर्यंत प्रदर्शित झालेले आहे. मात्र सण 1990 साली कश्मीरी पंडित झालेल्या अत्याचाराशीव आतंकवाद संबंधित प्रतीक्षेत असलेल्या डायरेक्टर विनोद अग्निहोत्री यांच्या द कश्मीर फाइल्स हा चित्रपट नुकताच देशभरात ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेला आहे. सदर चित्रपटात प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की
मात्र सन 1990 च्या दशकामध्ये काश्मिरी पंडितांना बेघर करून त्यांचेवर अमानवी झालेल्या अन्याय अत्याचारबद्दल तसेच त्या काळातील आतंकवाद आणि सध्या सुरू असलेल्या आतंकवादाची भयानक स्थितीचं वर्णन , अत्याचाराची भयावह भिषण स्थिती वास्तविकता द कश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या माध्यमातून सपूर्ण भारतासह जगभरात हळू हळू पोहचवत असुन आतंकवादाच समुळ उच्चाटन होणे ही देश हितासाठी अत्यंत आवश्यक असल्याने सदर चित्रपट सामान्य जनमाणसांपर्यत ,देशवासीयांपर्यत प्रत्येक घराघरात पोचवण्यासाठी व आतंकवाद विरोधाची लढाईप्रगल्भ करण्यासाठी द कश्मीर फाइल्स या चित्रपट संपूर्ण करमुक्त करण्यात यावा तसेच सदर चित्रपटाचे प्रदर्शन हे देशातील प्रत्येक जिल्हा तालुका, गाव -शहर या ठिकाणी असलेल्या करून देशातील प्रत्येक सिनेमा टॉकीज मध्ये प्रदर्शित करण्याची सक्ती करण्यात यावी अशी विनंती मागणी श्री नमो विचार मंचचे संस्थापक तथा भाजपा भुसावळ चे शिशिर जावळेयांनी केंद्रीय
माहिती व प्रसारण मंत्री श्री अनुराग ठाकूर यांना एका निवेदनाद्वारे केली असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे .सदर निवेदनावर भाजपा सक्रिय सदस्य चंद्रशेखर पाटील यांची सुद्धा स्वाक्षरी असल्याचे त्यांनी कळविले आहे.



