भुसावळ पालिकेची उद्या प्रभाग रचना प्रसिध्द होणार –

भुसावळ : राज्यात ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटत नसतानाच विरोध व महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याचा पवित्रा घेतला असतानाच दुसरीकडे निवडणूक आयोगाने प्रक्रिया पूर्ववत ठेवली आहे. याच नुसार पालिकेची प्रभाग रचना गुरुवार, 10 रोजी प्रसिध्द केली जाणार असल्याने पालिका निवडणुकीसाठी बिगुल वाजला, असे म्हणण्यास हरकत नाही.

17 मार्चपर्यंत सूचना व हरकती सादर करता येणार
प्रभाग रचनेवर हरकती व सूचना सादर करण्यासाठी मुख्याधिकारी यांच्याकडे निवडणूक कार्यालय अथवा संबंधीत प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय येथे 17 मार्चपर्यंत सादर करता येतील.