सखी श्रावणी महीला बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने समाजसेविका स्व. सिंधुताई सपकाळ यांना श्रध्दांजली अर्पण : मजूरांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे केले वाटप :


भुसावळ – हजारो अनाथांना मायेची ऊब देऊन त्यांना आपलेसे करुन पोरके करुन गेलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या माई स्व.सिंधुताई सपकाळ यांना येथील सखी श्रावणी महीला बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने आज २० जाने. २०२२ गुरुवार रोजी
दुपारी विकास कॉलनीमधील
हनुमान मंदिराचे प्रांगणात आयोजित कार्यक्रमात मोलमजूरी करणाऱ्या काही कुटुंबातील शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून भावपूर्ण आगळावेगळा उपक्रम राबवून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली .

 स्व . माईंना फक्त माल्यार्पण करून श्रध्दांजली वाहण्या पेक्षा काहि गरजु विद्यार्थांना शिक्षणासाठी ज्या काही आवश्यक गरजेच्या वस्तु लागत आहे त्या त्यांना देणे हे आम्हा सर्व सखींना योग्य वाटले म्हणून छोटेखानी उपक्रम साजरा करून हिच स्व माईंना  खरी श्रध्दांजली म्हणून कार्य केले असे भावोद्गार संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सौ राजश्री नेवे यांनी मनोगत व्यक्त केले . 
यावेळी माया चौधरी, स्मिता माहूरकर, मंदाकीनि केदारे, दिपा पाटील, महानंदा पाटील,शैला सावंत, रसिका माहुरकर,गोसेवक  रोहित महाले, मयुर सावकारे,यांचेसह परिसरातील नागरिक  उपस्थित होते,