पंतप्रधानांवर आक्षेपार्ह टिपणी करणार्‍या वाचाळवीर नाना पटोलेंवर कारवाई हवी : भुसावळातील भाजपा पदाधिकार्‍यांचे पोलिस प्रशाळसनाला निवेदन –


भुसावळ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी साकोली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह टिका केली होती. ‘मी मोदींना मारू’ शकतो व शिव्याही देवू शकतो, असे सांगून त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला तसेच हा देशाच्या पंतप्रधानांचा अपमान असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरतर्फे मंगळवारी भुसावळ तहसील प्रशासनाला तसेच शहर पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

निवेदन देताना भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, सरचिटणीस रमाशांकर दुबे, शेखर इंगळे, जयंतीलाल सुराणा, लक्ष्मण सोयंके, पवन बुंदेले, नारायण रणधीर, राजू खरारे, बिसन गोहर, शैलेजा पाटील, अनिता आंबेकर, कैलास शेलोडे, जयंत माहुरकर, मंगेश पाटील, शिशिर जावळे, धनराज बाविस्कर, संजय बोचरे, अनिरुद्ध कुलकर्णी, प्रशांत देवकर, विनीत पाटील, विजय डोंगरे, श्रेयस इंगळे, राहुल तायडे, चेतन बोरोले, चेतन सावकारे, अ‍ॅड.अभिजीत मेने, गोपीसिंह राजपूत, गौतम जोहरे, प्रशांत भट आदींची उपस्थिती होती.