भुसावळ – देशात व राज्यात ओमायक्रॉन आणी कोरोना संसर्गाच्या वेगाने वाढत्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर आरोग्य प्रशासना सर्तक झाले असुन , जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांच्या आदेशान्वये भुसावळ नगर परिषद प्रशासनाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने संयुक्तपणे रविवार रोजी कारवाई करण्यात आली यामध्ये भुसावळ उपविभाग हद्दीत कोविड १९ नियमाचे उल्लंघन व विना मास्क चे ११२ केसेस आणि ११,२०० /- रु दंड आकारण्यात आला . तसेच नियम न पाळण्याऱ्यां विना मास्क असलेल्या नागरीकांवर कार्यवाही करण्यात आली. नियम न पाळण्याऱ्या नागरीकांसह , व्यापारी, दुकानदार , यांच्या विरुद्ध कार्यवाही मोहिम सुरू केली आहे .
भुसावळ शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनत चालले असून दररोज कोरोना रुग्ण शतक गाठत आहे याकरीता नागरिकांनीं नियमांचे पालन करावे , मास्क लावा गर्दी टाळा असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे याांनी केले आहे .



