भुसावळ : मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी वनविभागाच्या दोन्ही कुंड येथे विटवे ता. रावेर येथील ज्योती विलास लहासे या विवाहित महिलेचे प्रेत सापडले होते. सदर महिलेने आत्महत्या केल्याची नोंद पोलिसात दाखल करण्यात आली आहे. मात्र या महिलेने आत्महत्या केली नसून घातपाताचा संशय तिच्या वडिलांनी व्यक्त केला आहे तसेच या प्रकरणाची सकल पोलीस चौकशी करण्याची मागणी मयत विवाहितेचे वडील अरुण जगन्नाथ अढळे व निळे निशाण संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी केली आहे.
भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात निशांत संघटनेच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अरुण अढळे व निळे निशाण संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी ही मागणी केली आहे.
यावेळी जिल्हा नियोजन समितीचे महेश तायडे, रावेर तालुका सरचिटणीस सुधीर सैगमिरे, रावेर तालुका उपाध्यक्ष अनिल वाघ धनगर, कार्याध्यक्ष शरद बगाडे, संघटक जलील खान, तालुकाध्यक्ष दीपक लोहार, शहराध्यक्ष महेंद्र महाले, एकनाथ अडागडे, बिललाला अडागडे, रोशन अडागडे, कवीस ससाने आदी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत पुढे बोलताना निळ निशाण संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर व अरुण अढळे यांनी सांगितले की, 28 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ज्योतीला फोन आला यानंतर ती पाण्याचा डबा भरून बाहेर शौचास जात असल्याचे सांगितले मात्र तासाभरानंतर ती घरी परतली नाही घरी येण्यास उशीर झाल्याने सर्वांनी तिचा शोध घेतला. याबाबत 28 डिसेंबरला मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी ज्योतीच्या मृत्यूची माहिती पोलिसांनी दिली. त्या दिवसापासून दिपक मनोरे हा ज्योती संदर्भात माहिती गोळा करीत असल्याचे समजले तसेच दीपक मनोरे याने मुली सोबत 25 डिसेंबर रोजी अतिप्रसंग केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या आहेत मागण्या
२८ डिसेंबर रोजी मिसिंग झालेल्या विवाहित महिलेचे प्रेत ३१ डिसेंबर रोजी सुकळी शिवारात दुईकुंठ येथे आढळून आले. त्या संदर्भात मुक्ताईनगर पो.स्टे . येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच दोन आरोपिंना अटक करण्यात आलेले असुन त्या दोघ आरोपिंना दिलेले माहिती हि दिशाभूल करणारी आहे, त्यामुळे मयताच्या मोबाईलचा मागिल सहा महिन्याचा सिडीआर तपासावा लोकेशन आणि रुटची माहिती मागवुन विश्लेषन करणे. मयताच्या गांवी ( विटवे ) येथे बारकाईने गुप्त चौकशी करणे घडलेल्या घातपाता बाबत माहिती मिळु शकते अशी मागणी अरुण अढळे व निळे निशाण संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर करण्यात आली आहे.


