गावठी कट्टा बाळगणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात –

जामनेर- शहरात सार्वजनिक जागी एक इसम हा त्याच्या कबज्यात गैरकायदा गावठी कट्टा ताब्यात बागळुन फिरत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक यांना मिळाल्याने पथक रवाना करून अंगझडती घेतली असता एक गावठी कट्टा मॅगझिन्सह एक जिवंत काडतुस आरोपी कडून ताब्यात घेण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, दि.13/01/ 2022 रोजी जामनेर शहरात खादगाव रोड वरील परिसरात सार्व.जागी एक इसम हा त्याच्या कबज्यात गैरकायदा गावठी कट्टा ताब्यात बागळुन फिरत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखा जळगांव पो.नि.किरणकुमार बकाले यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा जळगांव कडील स.फौ. अशोक महाजन,पो.हे.कॉ महेश महाजन,पो.हे.कॉ लक्ष्मण पाटील,पो.ना किशोर राठोड,पो.ना रणंजित जाधव,पो.ना श्रीकृष्ण देशमुख,पो.कॉ विनोद पाटील,पो.कॉ ईश्वर पाटील
चा.पो.हे.कॉ भरत पाटील सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव अशांना लागलीच त्या ठिकाणे पाठवले तेव्हा नेमलेल्या वरील पथकाने त्या ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेतले व त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव गाव बाळु श्यामा पवार वय – 22 रा. डोहरी तांडा ता. जामनेर असे सांगितले व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेला एक गावठी कट्टा मॅगझिन्सह एक जिवंत काडतुस 30.000 /- रु.कि.चा एक गावठी कट्टा व 1000 /- रु. कि.चा एक जिवंत काडतुसएकूण 31.000 /- रू. किंमतीचे असे त्याच्या जवळ मिळुन आल्याने आरोपीताची वैदयकीय तपासनी व मुदेमाल पंचनामा करुन पुढील योग्य ती कारवाई साठी जामनेर पो.स्टे च्या ताब्यात दिले.