भुसावळ – येथील सकल मराठा समाज बांधवांतर्फे शहरातील रेल्वे स्टेशन समोरील अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ राजमाता आऊसाहेबांच्या जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून अभिवादन करण्यात आले . प्रसंगी आयोजित रक्तदान शिबिरात जिजाऊच्यां लेकिंसह व लेकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रक्तदात्यासह रेडक्रासचे सहकार्य लाभले .
यावेळी गरीब व गरजुना अन्नदान तसेच फळवाटपही करण्यात आले
या सोहळ्यास सकल मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड.छावा संघटना यांचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
यशस्वितेकरीता सखल मराठा समाज भुसावळ तालुका मराठा सेवा संघ अध्यक्ष ॲड निलेश भंडारी यांचे मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व सदस्यांसह सर्व समाज बांधव यांनी परिश्रम घेतले .



