भुसावळ – भुसावळ येथील पर्यावरण सखीमंच तर्फे आज 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती निमित्त साकेगाव येथील जिजाऊ गार्डन मध्ये अनेक विविध झाडांचे रोपण करण्यात येवून उत्साहात जयंती साजरी करण्यात आली .
प्रारंभी साकेगाव येथे जिजाऊ गार्डन मध्ये राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा करून अभिवादन करण्यात आले . तदनंतर भुसावळ पर्यावरण सखीमंच तर्फे सरपंच , उपसरपंच आनंद ठाकरे व त्यांच्या पत्नी अनिता ठाकरे यांच्या उपस्थितीत वडाचे झाडं व विविध फुलझाडे तसेच गार्डनच्या दृष्टीने उपयोगात येणारी झाडे यांचे रोपण करण्यात आले. यावेळी सदर वृक्ष रोपे उपसरपंच आनंद ठाकरे व त्यांच्या पत्नी अनिता ठाकरे यांनी उपलब्ध करून दिली .
प्रसंगी पर्यावरण सखी मंचच्या सौ . महानंदा पाटील ,
तालुका अध्यक्षा सौ . रेखाताई सोनवणे व सखी मंचच्या राजश्रीताई ,वर्षाताई ,नूतन ताई , रेखा तायडे , मंदाकिनी केदारे, कविता महाले, रूपाली ताई यांचेसह पर्यावरण सखी मंचचे सर्व तालुका सदस्य उपस्थित होते . वृक्षरोपण करण्याकरीता साकेगाव ग्रामपंचायत व ग्रा .पं. सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले .



