भोळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कोविड लसीकरण शिबिर संपन्न

भुसावळ – येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात आज पंधरा ते अठरा वर्षे दरम्यान वय असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोविड लसीकरण शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद् घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर पी फालक यांचे हस्ते झाले. या प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी सर्वांनी केवळ लस टोचून घेऊन न थांबता नियमित मास्क वापरणे, सोशल डीस्टसिंग पाळणे, तसेच वेळोवेळी शासन आणि आरोग्य विभागाने दिलेला सूचनांचे पालन करावे असे तर वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप जैन यांनी कोरोना विषाणू ची लागण झाल्यास शरीरावर होणारे दीर्घकालीन दुष्परिणाम यांची माहिती दिली. या बरोबर च लॉक डाऊन च्या कालावधी मध्ये घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी नगर पालिका रुग्णालयातर्फे डॉ. संदीप जैन यांच्या सह सिस्टर पुनम साहेबराव इंगळे, आशा कार्यकर्त्या सौ. आशा प्रकाश खराटे, डाटा एंट्री ऑपरेटर श्री हर्षल चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ जी पी वाघुळदे यांनी, तर सूत्र संचालन आणि आभारप्रदर्शन सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ दयाघन एस राणे यांनी केले. कार्यक्रम आयोजन प्रसंगी महिला कार्यक्रम अधिकारी प्रा निर्मला वानखेडे यांच्या सह विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.आर.बी.ढाके प्रा डॉ संजय चौधरी, प्रा अनिल सावळे, प्रा.अनिल नेमाडे प्रा. के. व्ही धांडे व प्रा. आशिष महाजन यां सह सर्व आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते असे महाविद्यालयाचे प्रसिध्दी प्रमुख प्रा डॉ संजय चौधरी यांनी कळवले आहे