भुसावळ – शासनाच्या धोरणाप्रमाणे 15 वर्षाच्या वरील विद्यार्थ्यांची covid-19 लसीकरणाची मोहीम भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा महाविद्यालयात नुकतेच नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप चिद्रवार , सुप्रसिद्ध उद्योजक स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजचे सीईओ दीपक चौधरी, माध्यम तज्ञ सुप्रसिद्ध पत्रकार शेखर पाटील, संस्थेचे सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय कुमार नाहाटा डॉ. संदीप जैन ,पोलीस निरीक्षक दिलीप भागवत , प्राचार्य डॉ. मीनाक्षी वायकोळे , उपप्राचार्य प्रा उत्तम सुरवाडे, पर्यवेक्षक श्रीमती प्रा. शोभा तळेले मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
Covid-19 लसीकरणात भुसावळ शहर जळगाव जिल्ह्यात अव्वल स्थानी असून या लसीकरण मोहिमेचे महाविद्यालयात आयोजन केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप चिद्रवार यांनी कौतुक करून कोणत्याही शंकाकुशंका मनात न ठेवता सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व्हॅक्सिनेशन करून घ्यावे असे आवाहन याप्रसंगी बोलतांना केले.
माजी विद्यार्थी सुप्रसिद्ध उद्योजक दीपक चौधरी यांनी याप्रसंगी महाविद्यालयाला आर्थिक आणि टेक्नालाजी च्या संदर्भात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन विद्यार्थी दशेतील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी बोलताना ते भावुक झाले.
यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया मधले तज्ञ शेखर पाटील यांनी आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून महाविद्यालय राबवत असलेल्या उपक्रमांना समाज माध्यमाच्या द्वारे जगभर पोचले पाहिजे त्यासाठी आवश्यक असलेली सगळी टेक्नालाजी आपण महाविद्यालयात देण्यास तयार असल्याचे या प्रसंगी बोलताना सांगितले.
याप्रसंगी उपप्राचार्य यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, वरिष्ठ महाविद्यालय याप्रमाणेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे देखील संघटना असली पाहिजे. त्यांच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या उन्नती आणि विकासासाठी त्यांचं सर्वतोपरी सहकार्य आपल्याला या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा उपयोग करून घेतला पाहिजे. प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे यांनी त्याला मान्यता देऊन या उपक्रमासाठी सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या शिस्तीसाठी कायदा-सुव्यवस्था पाडण्याच्या कामे महाविद्यालयास आपले सर्वतोपरी सहकार्य राहील ,असे बाजारपेठ पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक दिलीप भागवत यांनी याप्रसंगी बोलताना आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रमुख डॉ.भाग्यश्री भंगाळे, समन्वयक प्रा टी एस सावंत, प्रा स्वाती पाटील, प्रा आर एम खेडकर, प्रा एन वाय पाटील, प्रा शैलेश पाटील, यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी महेश सरोदे, परिचारिका रोहिणी सरोदे, कुमार पाचपांडे ,भारती चौधरी कल्पना मे लागीर ज्योती पवार अर्चना नेहते प्रशांत कुलकर्णी ,प्रा एल.पी टाक, प्रा आर पी मसाने, प्रा जे डी धांडे, प्रा एच बी राजपूत, कार्यालयीन अधिक्षक श्री भगवान तायडे, आमचे सहकारी कर्मचारी वृंद, कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले



