जिद्द असेल तर यशाचा मार्ग नक्की सापडतो – आईएएस लोकेश पाटील राजपूत समाजाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन व सत्कार सोहळा संपन्न :


खंडाळा – जिद्द असेल तर यशस्वी होण्याचा नक्की मार्ग सापडतो याकरीता इच्छाशक्ती प्रबळ असावी असे मत केंद्रीय लोकसेवा आयोग (आई ए एस) परिक्षेत 944 गुण प्राप्त करून यश संपादन केलेल्या राजपूत समाजाचे लोकेश मनोहर पाटील यांनी व्यक्त केले .
भुसावळ तालुक्यात गुरुवार रोजी समस्त राजपूत समाजातर्फे आयोजित सत्कार सोहळ्या प्रसंगी सत्कारार्थी म्हणून लोकेश पाटील बोलत होते . प्रारंभी समस्त राजपूत समाजातर्फे लोकेश मनोहर पाटील यांचा केंद्रीय लोकसेवा आयोग (आई ए एस) परिषेत 944 गुण मिळवून उत्तम असे यश संपादन केल्या बद्दल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तदनंतर
राजपूत समाजाकडून दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा विनामूल्य दिनदर्शिका समाजास उपलब्ध करून दिल्याबद्दल लोकेश पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी लोकेश पाटील पुढे म्हणाले की , ज्ञान घेण्यासाठी अनेक प्रकारच्या वर्तमानपत्रांचा अवलंब केला. व दुसऱ्याच प्रयत्नात कुठल्याही प्रकारचा क्लास न लावता नियोजनबद्ध अभ्यास केला सोशल मीडिचा आवश्यक तीतकाच उपयोग केला .आणि यशस्वी झालो असे आपल्या यशाचे गमक सांगत आपल्या स्वतःच्या आरोग्याविषयी काळजी घेऊन उत्तम असा अभ्यास केल्याचा उपयोग नक्कीच आपल्याला होतो असेही पाटील यांनी यावेळी सांगीतले .
कार्यक्रम प्रसंगी समस्त राजपूत समाज बहुउद्देशीय सेवा संघाचे अध्यक्ष किशोर महाजन, कार्याध्यक्ष कैलास पवार, सचिव प्रवीण मोरे, सल्लागार तथा भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अशोक पाटील संस्थेचे सदस्य किरण पवार, रतनसिंग राजपूत, गोकुळसिंग राजपूत, प्रेमचंद पाटील, ललित पाटील,खंडू पाटील, श्रीकृष्ण चौधरी, विकास महाजन, विजय पाटील शंकर पाटील, एम टी पाटील, नथू बोरसे, बी.के पाटील, मोहन महाजन, संतोष पवार, व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रवीण मोरे यांनी केले तर आभार विजय पाटील यांनी मानले.