सरकारी कामात अडथळा निर्माण करणारे आठ सह अन्य 125 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल :

भुसावळ –तालुक्यातील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रामध्ये व 500 मेगावॅट बल्कर गेटवर सरकारी कामात अडथळा निर्माण करणारे आठ तर अनोळखी 125 इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रामध्ये दिनांक
05/01/2022 रोजी सकाळी 10 ते 10:25 वाजेच्या सुमारास प्रकल्प कार्यालय दिपनगर तालुका भुसावळ समोर सार्वजनिक जागी आरोपी यांनी गैरकायदयाथी मंडळी गोळा करून कामगारांचे पगार प्रलंबित असल्याचे कारणावरून तसेच लेबर कॉलनीत दि. 04/01/2022 रोजी रात्री बिहारी मजूराचा हृदयविकाराने मृत्यू झालेला होता त्याचा मृतदेह प्रकल्प गेटवर परत आणण्याचे मागणी करुन गैरकायदेशीररित्या 500 मेगावॅट बल्कर गेट वा प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करून जोरजोराने रोकडे साहेब मुर्दाबाद गोस्वामी मुर्दाबाद, भिम आमि जिंदाबाद अशा घोषणा देवून आम्ही करीत असलेल्या शासकीय कर्तव्यात दबाव आणून प्रकल्पगेट जोरजोरात हलवून तोडून आत मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तसेच फिर्यादी व फिर्यादींचे सहकारी यांचेवर हल्ला करण्याचे उददेशाने अंगावर धावून येथून फिर्यादी व फिर्यादीचे सहकारांवर दगड फेकून मारल्याने तालुका पोलीस स्टेशनला सरकारी कामात अडथळा निर्माण करणारे आठ तर अनोळखी 125 इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की फिर्यादी धनंजय राजेंद्र सोनवणे, वय 32 वर्ष, व्यवसाय नोकरी, सहायक सुरक्षा अधिकार दिपनगर औष्णिक विद्युत केंद्र दिपनगर बिल्डिंग नं. 11/5. एमएफ टाईप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी यांनी गैरकायदयाथी मंडळी गोळा करून कामगारांचे पगार प्रलंबित असल्याचे कारणावरून तसेच लेबर कॉलनीत दि. 04/01/2022 रोजी रात्री बिहारी मजूराचा हृदयविकाराने मृत्यू झालेला होता त्याचा मृतदेह प्रकल्प गेटवर परत आणण्याचे मागणी करुन गैरकायदेशीररित्या 500 मेगावॅट बल्कर गेट या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करून जोरजोराने रोकडे साहेब मुर्दाबाद गोस्वामी मुर्दाबाद, भिम आर्मी जिंदाबाद अशा घोषणा देवून आम्ही करीत असलेल्या शासकीय कर्तव्यात दबाव आणून प्रकल्पगेट जोरजोरात हलवून तोडून आत मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी गणेश सपकाळे यांने जमावातील इसमांना भडकविल्याने गर्दीतील इसम है फिर्यादी व फिर्यादांचे सहकारी यांचेवर हल्ला करण्याचे उददेशाने अंगावर धावून येथून फिर्यादी व फिर्यादीचे सहकारांवर दगड फेकून मारले. अशाप्रकारे फिर्यादी व फिर्यादीच सहकारी हे करीत असलेले शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण करत शासकीय कर्तव्य करु नये म्हणून शासकीय कामात दबाव आणला म्हणून फिर्यादी यांनी गणेश सपकाळे, शकील शेख, संदीप तायडे ऊर्फ मामा, प्रभाकर जमदाळे, सुरज टिटोरे, नरेश बि-हाडे, पवन रोकडे, विशाल वाघमारे व इतर अनोळखी 100 – 125 इसमांविरुध्द पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या आदेशावरून गुरुन 04/2022 भा.द वि.कलम 353, 188,186,336,447,143,147,148,149 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 112,117,135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि प्रकाश वानखडे करीत आहे.