भुसावळ – येथील बाजारपेठे पोलीस स्टेशनला 2 जानेवारी 2022 ते 8 जानेवारी 2022 पर्यत पोलीस स्थापना दिवस साजरा करण्यात येत आहे.यामध्ये शालेय विद्यार्थी,जेष्ठ नागरिक,शहरातील नागरीक अशांना पोलीस स्टेशनचे कामकाज कसे चालते त्याबाबत माहिती देण्यात येत आली.

सविस्तर वृत्त असे की, बाजारपेठ पोलीस स्टेशनला 2 जानेवारी 2022 रोजी पोलीस स्थापना दिनानिमित्त भुसावळ शहरातील नागरीकांना माहिती देण्यात आली.तसेच 3 जानेवारी 2022 रोजी पोलीस स्थापना दिनानिमित्त भुसावळ शहरातील महाराणा प्रताप शाळेतील 9 वी व 10 वी चे विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन संबंधी व शस्त्रांची माहिती दिली.
4 जानेवारी 2022 रोजी पोलीस स्थापना दिनानिमित्त भुसावळ शहरातील महाराणा प्रताप शाळेतील 9 वी व 10 वी चे विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन संबंधी व शस्त्रांची माहिती दिली.5 जानेवारी 2022 रोजी पोलीस स्थापना दिनानिमित्त भुसावळ शहरातील अहिल्या देवी कन्याशाळा येथे 10 वी सायबर क्राईम व महिला अत्याचार गुन्ह्या संबंधी माहिती दिली.तसेच दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी पोलीस स्थापना दिनानिमित्त बँक मॅनेजर यांची बँक व एटीएम सुरक्षा संबंधी बैठक करण्यात येणार आहे.दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी पोलीस स्थापना दिनानिमित्त जेष्ठ नागरिक यांची बैठक होणार आहे.दिनांक 8 जानेवारी 2022 रोजी पोलीस स्थापना दिनानिमित्त कॉलनी परिसर बैठक घेण्यात येणार आहे.
दिनांक 4 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11:15 ते 13:30 वाजे पावतो भुसावळ बाजारपेठे पोलीस स्टेशनला पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी महाराणा प्रताप शाळेतील 40 ते 50 विद्यार्थाना पोलीस स्थापना दिवसांचे महत्व सांगून पोलीस स्टेशनचे कामकाज कसे चालते याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सदर उपस्थित विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन मधील पोलीस
ठाणे अंमलदार कक्ष सीसीटीएनएस प्रणाली बिनतारी संदेश यंत्रणा बारनिशी कक्ष क्राईम रूम कक्ष अशा पोलीस
स्टेशन मधील महत्त्वाचे कक्ष दाखवण्यात येऊन त्यासबंधीचे कामकाजाविषयी माहिती सविस्तर विद्यार्थ्यांना देण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक महेश घायवड यांनी पोलीस स्टेशनला उपलब्ध असलेली साधनसामग्री ढाल,लाठी,एस एल.आर.पिस्टल,गॅस गन,पम्प गन,ॲक्शन गन संबंधी माहिती देण्यात आली सदर वेळी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत सपोनि गणेश धुमाळ व पोलीस स्टॉप तसेच महाराणा प्रताप शाळेचे शिक्षक वृंद कैलास गायकवाड सर सुधाकर सपकाळे सर जीते सैतवाल सर असे उपस्थित होते


