महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 191वी जयंती साजरी


भुसावळ- येथील कला, विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित कार्यक्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाला विभागप्रमुख प्रा. डॉ. के.के. अहिरे विभागातील ज्येष्ठ प्रा डॉ. जे. एफ पाटील, प्रा पुरुषोत्तम महाजन, प्रा. डॉ. दिनानाथ पाठक, प्रा .गौतम भालेराव, प्रा डॉ. स्वाती महाजन, प्रा. भारती सोनवणे, प्रा. वंदना नेमाडे कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विभागातील ज्येष्ठ प्रा.डॉ. जे. एफ. पाटील यांनी सावित्रीबाईंच्या जीवन कार्यावर टाकला. प्रत्येक स्त्रीने त्यांचे गुण आत्मसात करावे हे देखिल सांगितले. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉं के के अहिरे यांनी आपल्या भाषणातून क्रांतीज्योती सावित्रीबाईनी शिक्षणासाठी घेतलेले कष्ट मांडले. तसेच कार्यक्रमाला प्रा एस टी धुम , प्रा.सांळुके, प्रा उज्वला महाजन, प्रा. शितल सोनवणे, हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ.मनोज पाटील प्रा.राजेंद्र तायडे तसेच वाणिज्य शाखेतील प्रा. डॉ ममता पाटील, प्रा. स्वाती शेळके, प्रा.हेमंत सावकारे कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पुरुषोत्तम महाजन यांनी केले. आभार प्रा. गौतम भालेराव यांनी मानले. या कार्यक्रमाला बहुसंख्येने मराठी विषयाचे विद्यार्थी उपस्थित होते.