भुसावळ – ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ हि सैनिकांसाठी लागणारे शस्त्रास्त्रे दारुगोळा यांचे पॅकेजेस तयार करण्यासाठी आणि सैन्य दलाला पुरवीण्यासाठी ओळख ली जाते,
पिनाका रॉकेट पॉड एम के -1 बनवण्याचे काम 2014 पासून यशस्वीपणे केले जात आहे.
पिनाका रॉकेट पॉड एम के -1 ची रेंज 38 किलो मीटर आहे.

ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळने
1 सप्टेंबर 2021 रोजी पिनाका रॉकेट पॉडचा नवीन आधुनिक प्रकार डीपीआयसीएम (एडीएम ) बनवून ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर येथे पाठविण्यात आला, त्याची चाचणी पोखरण या ठिकाणी दिनांक 9. 12 . 2021 ला यशस्वीरित्या पूर्ण केली.
हे डीपीआयसीएम (एडीएम ) वॉरहेड नियमित एम के -1रॉकेट पेक्षा वेगळे आहे
आणि वेग वेगळ्या बॉम्बलेटसह स्फोट होऊन शत्रूचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते.
ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळने डीपीआयसीएम (एडीएम )वॉरहेड पिनाका रॉकेटसाठी पॉड तयार केला आहे.
हा पॉड एआरडीई पुणे ( डीआरडीओ ) ने विकसित केला आहे. पॉडचा वापर रॉकेट उडवण्यासाठी केला जातो.
हि ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळसाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे.
या पिनाका रॉकेट पॉडच्या यशस्वी चाचणीने आयुध निर्माणी भुसावळचे अधिकारी व कर्मचारी अतिशय आनंदी आणि उत्साहित आहेत.
ऑर्डनन्स फैक्ट्री भुसावळचे महाव्यवस्थापक वसंत निमजे, ज्यांच्या नेतृत्वाखाली हा पॉड तयार करण्यात आला आहे,
त्यांनी या यशस्वी चाचणीबद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
याशिवाय, ऑडनन्स फैक्ट्री भुसावळ अत्याधुनिक गाईडेड पिनाका रॉकेट पॉड तयार करत असून, दोन महिन्यांनंतर त्याची चाचणी होण्याची शक्यता आहे.
गाइडेड पिनाका रॉकेटची रेंज 75 किमी आहे आणि त्याला मार्गदर्शन किट बसवण्यात आली आहे. त्यामुळे शत्रूंच्या ठिकाणावर अचूक निशाणा साधला जाऊ शकतो . अशी माहिती ऑर्डनन्स फैक्ट्री भुसावलचे जनसंपर्क
बी देवीचंद ( डीजीएम ) यांनी दिली आहे.


