भुसावळ – येथील जामनेर रोड भागातील संतधामजवळील दूर्गा कॉलनीत दि. 24 ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ प्रारंभ झाला आहे. कै. सुधा पांडुरंग जंगले व कै. पराग पांडुरंग जंगले यांच्या पुण्यस्मरणार्थ या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते श्रीहभप लक्ष्मण महाराज चिखलीकर भुसावळ हे आहेत सप्ताहात दररोज पहाटे काकडाआरती, सकाळी विष्णुसहस्रनाम, सकाळी 9 ते 12 व दुपारी 2 ते 5 श्रीमद् भागवत कथा आणि सायंकाळी हरिपाठ होईल. दि. 31 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे. भाविकांनी श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक पांडुरंग एकनाथ जंगले, संगीता पराग जंगले, अथर्व पराग जंगले व वेदांत पराग जंगले यांनी केले आहे.



