जळगाव- येथील जळगाव रनर्स ग्रुप आयोजित
खानदेश वर्च्युअल रन 2021 या 21 किमी, 10 किमी, 5 किमी व 3 किमीच्या रनिंग मध्ये भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या साठहून अधिक धावपटूंनी यशस्वी सहभाग नोंदविला. 18 व 19 डिसेंबर शनिवार व रविवार रोजी धावपटूंनी आपल्या सोयीनुसार व वेळेनुसार स्वतःच्या शहरातून यामध्ये सहभाग नोंदवायचा होता.कोविड आजाराच्या पार्श्वभूमीवर या वर्षी ही स्पर्धा वर्च्युअल पद्धतीने घेण्यात आले. धावण्याचे निर्धारित अंतर पूर्ण केल्यानंतर प्रत्येक धावपटूने मोबाईल मधील रनिंग ॲपच्या सहाय्याने नोंदविलेल्या अंतराचा फोटो आयोजकांनी सांगितलेल्या संकेतस्थळावर अपलोड करायचा असतो. सदर नोंदीची पडताळणी केल्यानंतर यशस्वी धावपटूंना आयोजकांतर्फे प्रमाणपत्र, पदक व टी-शर्ट प्रदान करण्यात येईल अशी माहिती श्री प्रवीण फालक यांनी दिली.
भुसावळच्या धावपटूनी सदरचा रन शनिवारीच पूर्ण केला. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. 21 किमी साठी पहाटे 4:30 वाजता, 10 किमी साठी पहाटे 5:30 वाजता, 5 किमी साठी 6.00 वाजता तर 3 किमी साठी सकाळी 6:30 वाजेची धावायला सुरुवात करण्याची वेळ ठरविण्यात आली होती. धावणे पूर्ण झाल्यानंतर सर्व श्रेणीतील धावपटूंची एकत्रित सकाळी 7.30 वाजता स्ट्रेचिंग एक्झरसाइज घेण्यात आले.
21 किमीच्या धावपटूंसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण – झेडटीएस- पुन्हा परत- नाहाटा चौफुली तेथून परत येऊन वसंत टॉकीज समोरून जळगाव रोडवरील वाय पॉईंट व तेथून पुन्हा क्रीडांगणावर परत असा मार्ग ठरविण्यात आला होता. 21 किमीच्या श्रेणीत डॉ. नीलिमा नेहेते व प्रिया पाटील या महिला धावपटूंनी सहभाग नोंदविला होता. त्यांचे विशेष अभिjनंदन यावेळी करण्यात आले.
10 किमी साठी झेडटीएस मार्ग वगळता 21 किमी साठी असणारा शहरातील जामनेर रोड व जळगाव रोडवरील मार्ग कायम ठेवण्यात आला होता. ऐश्वर्य वर्मा व संस्कार पाटील या बालकांनी देखील 10 किलोमीटर मध्ये यशस्वी सहभाग नोंदविला.
5 साठी क्रीडांगण ते नहाटा चौफुली व परत क्रीडांगण तर 3 किलोमीटर साठी क्रीडांगण ते अष्टभुजा मंदिर व परत क्रीडांगण असा मार्ग होता.
खानदेश वर्च्युअल रनमध्ये भुसावळ येथील धावपटूंनी इतक्या मोठ्या संख्येने सहभाग नोंदविलाबद्दल जळगाव रनर्स ग्रुपच्या किरण बच्छाव, विक्रांत सराफ, डॉ. राहुल महाजन, डॉ. सोनाली महाजन, उमेश महाजन, ज्ञानेश्वर
बढे या सदस्यांनी सर्व धावपटूंचे विशेष अभिनंदन केले.
21 किमी चे धावपटू : डॉ. नीलिमा नेहेते, प्रिया पाटील, प्रदीप सोलंकी, संदीप कुमार वर्मा, विजय पाटील ,उमेश घुले, प्रवीण वारके, रंजीत खरारे , गणसिंग पाटील, विजय फिरके, विलास पाटील ,सचिन मनवानी, कैलास छाब्रा, प्रकाश आठवानी,युवराज सूर्यवंशी.
10 किमीचे धावपटू: नीलांबरी शिंदे, चित्रा करकरे, मिनी जोसेफ, डॉ. चारुलता पाटील, मीना नेरकर, सीमा पाटील, आराधना तांबे, ऐश्वर्या वर्मा, संस्कार पाटील, छोटू गवळी, आनंद सपकाळे, सारंग चौधरी, सौरभ सरकार, डॉ. निर्मल बलके, इसाक गवळी, राकेश पाटील ,अभिजित शिंदे, जिजाबराव चौधरी, दीपेश कुमार सोनार, हर्षल लोखंडे, श्रीकांत नगर नाईक ,विलास सुखदेवे, प्रवीण पाटील.
5 किलोमीटरचे धावपटू: पूजा बलके, पारुल वर्मा ,डॉ उमाकांत चौधरी, आरती चौधरी.
3 किलोमीटरचे धावपटू: कांचन पाटील, देवेंद्र पाटील ,विद्याधर इंगळे



