वरणगाव काँग्रेस शहराध्यक्षांनी तरुणाचा हरवलेला मोबाइल देवून केले कौतुकास्पद कार्य ;

वरणगांव – येथिल काँग्रेसचे शहराध्यक्ष अशपाक काझी यांना पंधरा हजार रुपये किमतीचा ओपो कंपनीचा मोबाइल रिक्षामध्ये सापडला होता .पोलिसांच्या सहकार्याने तो त्यांनी मुळ मालकाचा शोध घेवून परत केला .यामुळे संबंधित तरुणाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले व त्याने मनःपूर्वक धन्यवाद मानले .
सदरची घटना दि २३ नोव्हेंबर रोजी घडली . त्यांच्या भावाच्या रिक्षाने भुसावळहुन पाहुण्यांना पोहचवून घरी आल्यावर त्यांना रिक्षाच्या मागील बाजुस पंधरा हजार रुपये किमतीचा ओपो कंपनीचा मोबाइल दिसला .आजच्या त्रस्त व धकाधकीच्या काळात एखाद्या गरीबाचा 15 हजाराचा मोबाइल त्याचेसाठी खुप महत्वपूर्ण आहे एवढेच नव्हे तर आजकाल मोबाईल मध्ये अनेकांचा बहुतांशी महत्वपूर्ण डाटा सेव्ह असतो यामुळे सबंधिताचे आतोनात नुकसान होते व पैशांचा फटका बसतो तो वेगळा . असा विचार करून अशपाक काझी यांनी त्वरीत त्याच्या कव्हरमधील आधार कार्डच्या आधारे मोबाईल धारकाशी संपर्क साधला तसेच वरणगांव पोलीस स्टेशनचे एपीआय आशिषकुमार अडसूळ यांना कळवीले.
एपीआय आशिषकुमार सहकार्याने मोबाईलचे मुळ मालक यांना कॉल केला असता राहुल मनोहर धुंदे मुक्काम पोस्ट काटोल नागपूर यांचा असल्याचे सिद्ध झाले .दरम्यान राहुल धुंदे
यांचेकडे सुपूर्द केला. तेंव्हा त्यानीं अशपाक काझी यांचे आभार मानून आजही तुमच्या सारखे देव माणूस व मानुसकी असल्याचे सांगत आभार मानले यावेळी चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.