भुसावळ – जळगांव शहरातील चौगुले प्लॉट भागातील नाभिक समाज बांधव या इसमाला गुन्हेगारी प्रवृत्तीचे संशयित आरोपीतांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता पैसे न दिल्याचा राग आल्याने चॉपरने हत्या केल्याची घटना दिनांक २१/११/२०२१ रोजी घडली या घटनेचा भुसावळ येथील नाभिक संघ शहर शाखेतर्फे निषेध करण्यात आला असून नाभिक संघातर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना निवेदन देण्यात आले.

अधिक माहिती अशी की,जळगांव शहरातील चौगुले प्लॉट भागातील नाभिक समाज बांधव सुनिल सुरेश टेमकर वय ३६ राहणार प्रजापत नगर ,ममुराबाद रोड जळगांव यांचे सलून दुकान आहे.दिनांक २१/११/२०२१ रोजी रात्री १०:०० वाजेच्या दरम्यान गुन्हेगार प्रवृत्तीचे संशयित चार जण दारू पिण्यासाठी पैसे मागू लागले व त्यांना पैसे न दिल्यामुळे त्यांचा राग आल्याने त्यांनी नाभिक बांधवांची चॉपर सारख्या शस्त्राने निर्घृण हत्या केली. या सराईत गुन्हेगारांना शोधून त्यांना कठोर शिक्षा व्हावी व या परिवाराला न्याय मिळावा अशी मागणी संपूर्ण नाभिक समाजाच्या वतीने तसेच नाभिक संघ भुसावळ व समाजाच्या विविध संघटना यांनी केली आहे .
अन्यथा नाभिक संघ तीव्रआंदोलन छेडेल
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आळा बसणे आवश्यक आहे.अन्यथा असे प्रकारचे भ्याड हल्ले करण्याची प्रवृत्ती बळावेल. आरोपींची कसून चौकशी करून कठोर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना नाभिक समाजावर घडू नये अन्यथा नाभिक संघ तीव्रआंदोलन छेडेल असा इशाराही देण्यात आला.यासाठी मंगळवार रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना नाभिक समाज बाधव यांनी निवेदन दिले काही कारणात्सव डीवाएसपी बाहेर असल्याने यांच्या आदेशाने निवेदन आवक जावक विभागातील कर्मचाऱ्यांनी स्वीकारले.


