पाचोरा- शहरात एक वर्षे करीता हद्दपार असलेल्या आरोपीस शहरात बेकायदेशीररित्या प्रवेश केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी सापळा रचून ताब्यात घेतले .
जिल्हापोलीस अधीक्षक डॉ.श्री प्रविण मुंढे ,अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना हदपार आरोपी अटक करणे बाबत आदेशित केले होते त्यामुसार दिनांक 22 / 11/ 2021 रोजी संध्याकाळी 5:40 वाजेच्या सुमारास पाचोरा शहरात रिलायन्स पेट्रोल पंपा जवळ शहरात एक वर्षे करीता हद्दपार असलेला आरोपी पंकज ऊर्फ ( भोला ) शंकर मोरे वय-20 रा.रिलायन्स पेट्रोल पंपा जवळ भडगाव रोड पाचोरा हा पाचोरा शहरात बेकायदेशीर रित्या प्रवेश करत असल्याची गुप्त बातमीदारा मार्फत माहीती
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार अशोक महाजन
पो.हे.कॉ लक्ष्मण पाटील , पो.ना किशोर राठोड , पो.ना रणंजीत जाधव , पो.ना श्रीकृष्ण देशमुख
पो.कॉ विनोद पाटील , पो.कॉ ईश्वर पाटील अश्यांना लागलीच त्या ठिकाणी पाठवले त्यावरून वरील नेमलेल्या सर्व अंमलदार यांनी लागलीच त्या ठिकाणी जावुन आरोपीस ताब्यात घेतले
आरोपी याला एक वर्षा करीता हदपार केले असतांना सुध्दा तो महाराष्ट्र शासन तसेच उपविभागीय दंडअधिकारी ता.पाचोरा जि.जळगाव यांचे आदेशाचे उल्लंघन करुन पाचोरा शहरात मिळुन आला म्हणुन त्यास वैदयकीय तपासनी करुन योग्य ती कारवाई कामी पाचोरा पो.स्टे च्या ताब्यात दिले .



