जिल्हा बँक निवडणुकीत चक्क पाठिंबा जाहीर केलेल्या उमेदवाराचा विजय – राजकीय चित्र पालटल्याने खळबळ : अवघ्या एका मताने जनाबाई महाजन यांचा विजय ;

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी आठ वाजता सुरूवात झाल्यानंतर सर्वाधिक खळबळ रावेरातील निकाल जाहीर झाल्यानंतर उडाली. रावेर मतदार संघाच्या लागलेल्या निकालाची सर्वत्र चर्चा रंगत असून त्याला कारणही तसेच आहे. माजी आमदार अरुण पाटील यांना जाहिरपणे पाठिंबा देणार्‍या उमेदवार व रावेर विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघातील सहकार पॅनलच्या उमेदवार जनाबाई गोंडू महाजन एक मताने विजयी झाल्याने राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. नेमके हे घडलेच कसे? यावर आता राजकीय चर्चा झडू लागल्या आहेत. जनाबाई महाजन यांना 26 तर अरुण पाटील यांना 25 मते मिळाली आहेत.