रेल्वेने पुढील सुचनेपर्यंत अमरावती आणि सुरत दरम्यान सुपरफास्ट द्वि-साप्ताहिक ट्रेन पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील पुढीलप्रमाणे: –

ट्रेन क्रमांक 20925 अतिजलद द्वि-साप्ताहिक ट्रेन दि. २१.११.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत प्रत्येक शुक्रवार आणि रविवारी १२.२० वाजता सुरत येथून सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी २२.२५ वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 20926 अतिजलद द्वि-साप्ताहिक ट्रेन दि. २२.११.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत प्रत्येक सोमवार आणि शनिवारी ०९.०५ वाजता अमरावती येथून सुटेल आणि सुरत येथे त्याच दिवशी १९.०५ वाजता पोहोचेल.
थांबे: बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, धरणगाव, अमळनेर, नरडाणा, सिंदखेड, दोंडाईचा, नंदुरबार, नवापूर, व्यारा, उधना जं.
संरचना: १ वातानुकूलित चेअर कार, ४ द्वितीय श्रेणी चेअर कार, १२ द्वितीय आसन श्रेणी.
आरक्षण: 20926 अतिजलद द्वि-साप्ताहिक ट्रेनसाठी सामान्य शुल्कासह बुकिंग दि. २०.११.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.


