भुसावळात जिल्हा कॉग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभागातर्फे माजी पंतप्रधान स्व .इंदीरा गांधी यांची जयंती साजरी ;


भुसावळ – जळगाव जिल्हा कॉग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभाग व राजीव गांधी वाचनालय व ग्रंथालयाचे संयुक्त विदयमाने भारताच्या प्रथम महिला प्रधानमंत्री आर्यन लेडी स्व. इंदीरा गांधी यांची जयंती नसरवानजी फाईल येथील राजीव गांधी वाचनालयात साजरी करण्यात आली .
प्रारंभी जिल्हा अध्यक्ष मो मुनव्वर खान,युवा अध्यक्ष ईम्रान खान, शहर अध्यक्ष अल्पसंख्यांक सलीम गवळी,शहर सचीव हमीद शेख सर महीला शहर अध्यक्ष यास्मीन शेख डॉ नईम मझहर,यानी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष जे बी कोटेचा,शहर उपाध्यक्ष संजय खडसे, शहर उपाध्यक्ष हमीदा गवळी, यास्मीन कुरेशी,जानी गवळी,फातेमा आपा व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.