डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी ,पुणे येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रांताध्यक्ष, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष व अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष सन्मा अभ्यंकर यांनी बार्टी संस्थेमार्फत अनुसूचित जाती साठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांचा गुरुवार दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजी बार्टी सभागृहात आढावा घेतला.

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी बार्टीने यूपीएससी, एमपीएससी, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देतानाच अनुसूचित जातीतील ग्रॅज्युएशन,डिप्लोमा,आयटीआय,आयटी इंजीनियरिंग आदी शिक्षण घेतलेल्या बेरोजगार विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार जिल्हानिहाय माहिती संकलित करून त्यांना विविध क्षेत्रात प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून द्यावा तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान शिष्यवृत्ती योजनांची उत्पन्नाची मर्यादा शिथिल करावी व बार्टीने संशोधन व प्रशिक्षण अधिक गतीने घ्यावे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा). ज.मो. अभ्यंकर यांनी व्यक्त केले . यावेळी समाज कल्याण चे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये , महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य श्री.आर.डी. शिंदे,श्री .के आर. मेढे, बार्टीच्या निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार,आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास व प्रतिमेला श्री ज.मो.अभ्यंकर, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .मान्यवरांचे स्वागत महासंचालक यांनी पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन केले. बार्टीतील विविध योजना व उपक्रमांची नाविन्यपूर्ण माहिती श्री धम्मज्योती गजभिये यांनी या आढावा बैठकीत दिली .
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती मा. डॉ. प्रशांत नारनवरे, समाज कल्याण यांनी या आढावा बैठकीत दिली. या आढावा बैठकीला बार्टी व समाज कल्याण विभागातील अधिकारी उपस्थित होते.पुणे : दिनांक 18 नोव्हेंबर प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी ,पुणे येथे राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी बार्टी संस्थेमार्फत अनुसूचित जाती साठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांचा गुरुवार दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजी बार्टी सभागृहात आढावा घेतला.
यावेळी समाज कल्याण चे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये , महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य श्री.आर.डी. शिंदे,श्री .के आर. मेढे, बार्टीच्या निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार,आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पूणे जिल्हा अध्यक्ष श्री एकनाथ आंबले व सर्व पदाधिकाऱ्यांनी साहेबांचे स्वागत केले व शिक्षकांच्या समस्या मांडून मार्गदर्शन घेतल महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्य समन्वयक नितीन चौधरी यांनी कळवीले


