भुसावळ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा ; चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव ;
भुसावळ : भुसावळातील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा समाजसेवक व अष्टभूजा डेअरीचे संचालक नितीन धांडे यांचा वाढदिवस मंगळवार, 16 नोव्हेबर रोजी शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून, सोशल मिडीयावरून त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देत जल्लोषात साजरा केला .
वाढदिवस निमित्त दिवसभर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. अष्टभूजा गणेश मंडळातर्फे मध्यरात्री 12 वाजता भला मोठा केक कापून जल्लोष करण्यात आला.
दरम्यान भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी, माजी नगरसेवक संतोष बारसे, समाजसेवक देवा वाणी, स्वीकृत नगरसेवक प्रा.सुनील नेवे, गब्बर चावरीया, सनी गोने, मनीष पाचपांडे, धीरज चौधरी यासह कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मिडीयाद्वारे धांडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.



