कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करा – जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांच्या मागणीला यश ; मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश ;


भुसावळ – जळगांव जिल्ह्यातील सिंचन विभागात गौण खनिजाची रक्कम बनावट पावत्या दाखल करून बोगस बिले तयार करून काढण्यात आल्या प्रकरणी तसेच शासनाकडे पावत्या जमा केलेली नसून शासनास गौण खनिजाच्या रुपात मिळणारा महसूलाचे नुकसान केलेले आहे.याप्रकरणी जि.प. सदस्य पल्लवीताई सावकारे यांनी तत्कालीन जिल्ह्याधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार दाखल केल्यानंतरही याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प जळगाव यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गौण खनिज प्रकरणी कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पारित केले आहे.

सविस्तर वृत्त असे की, उपविभागीय जलसंधारण विभागातील सिंचन विभागांतर्गत करण्यात आलेल्या कामासंदर्भात जोडलेल्या तपशीलातील कंत्राटादार यांनी गौण खनिजाची रक्कम बनावट पावत्या दाखल करून शासनाकडे जमा केलेली नसून शासनास गौण खनिजांच्या रुपात मिळणाऱ्या महसुलाचे नुकसान केलेले आहे. याबाबतीत मक्तेदारास गौण खनिज पावतीनुसार देयकातून सूट दिलेल्या रक्कमाबाबतच्या कामनिहाय व मक्तेदारास नाव निहाय सविस्तर तपशील जोडलेला आहे.त्यानुसार उपविभागाशी संबंधित कंत्राटदार यांचे विरुद्ध तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मा.डॉ.पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्या परिषद जळगांव यांनी दिनांक १५/११/२०२१ रोजी पारित केल्याने सिंचन विभागात खळबळ माजली आहे.तसेच संबंधित कंत्राटदार यांचेवर गुन्हे दाखल करून त्यांचेकडून स्वामीत्वधनाची रक्कम व्याजासह वसूल करून शासन दरबारी जमा करण्याचे आदेश दिले आहे.

सदर गौण खनिज प्रकरणी कंत्राटदारांनी बनावटी पावत्या व तहसीलदारांच्या बनावट शिक्क्यांचा वापर करून शासनाची दिशाभूल केली आहे.तसेच दोन ब्रास रेती वाहतूक करण्यासाठी मोटरसायकल व तीन चाकी वाहन व शेतीसाठी वापरण्यात येणारे ट्रॅक्टर यांचा वापर केलेला आहे.याबाबत जि.प.सदस्य पल्लविताई सावकारे यांनी शासन दरबारी पुरावे सादर करून पाठपुरावा केलेला असून आज रोजी एस.एल.पाटील (डेप्युटी इंजिनियर),एच.आर.झोपे (डी.ई. रेरीरेड)एस.एस.देणगे (डेप्युटी इंजिनियर)आर.बी.सोनवणे (ज्यू. इंजिनियर) पी.एल.हिरे (सेक्ट.इंजिनियर) बी.पी. पाटील(सेक्ट.इंजिनियर) ए.आर. पाटील (सेक्ट.इंजिनियर) पी.बी.कुलकर्णी (सेक्ट.इंजिनियर) एस.जी.गायकवाड (सेक्ट.इंजिनियर)आर.टी.पाटील (डेप्युटी इंजिनियर) तत्कालीन इंजिनियर यांनी कंत्राटदार यांच्याशी संगमताने करून शासनाची दिशाभूल करून बनावटी पावत्या बनवून शासनाचा महसूलाचे नुकसान केलेले होते.याप्रकरणी डेपटी इंजिनियर यांना चौकशी करून संबंधित ठेकेदार एरंडोल, भडगाव,जळगांव,पाचोरा अशा गावातील ३६ कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचेकडून व्याजासह वसूल ६३५०४१३ / रुपये रक्कम करण्याचे आदेश दिनांक १५/११/२०२१ रोजी डॉ.पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.जळगांव यांनी पारित केले आहेत.