भुसावळात देवगिरी कल्याण आश्रम व आदिवासी ठाकुर समाज यांच्यावतीने भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी ;

भुसावळ – थोर क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांची जयंती कल्याण आश्रम भुसावळ व आदिवासी ठाकूर समाज यांच्याकडून साजरी करण्यात आली . यानिमित्त येथील जामनेर रोडवरील भगवान बिरसा मुंडा चौकात ठाकूर समाजाचे अध्यक्ष गोपाळ ठाकूर , नगरसेवक महेंद्र सिंग ठाकूर ,देवगिरी कल्याण आश्रमाचे प्रांत उपाध्यक्ष डॉ. किशोर मोरे यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण व दिपदान करून प्रतिमा पूजन करण्यात आले.
कल्याण आश्रमाचे उपाध्यक्ष डॉ.किशोर मोरे यांनी भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी जनजाति समाज यांच्यावर ब्रिटिशांकडून होणाऱ्या अत्याचाराला कसा लढा दिला व सनातन धर्म टिकवण्यासाठी प्राणाची आहुती दिली यावर भाष्य केले तर नगरसेवक महेंद्र सिंग ठाकूर यांनी ठाकूर समाजाने या आदर्श क्रांती विरांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून समाजासाठी काम करावे असे आपल्या मनोगतात व्यक्त केले ठाकूर समाज अध्यक गोपाळ ठाकूर यांनी बिरसा मुंडा यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत चा इतिहास सर्वांसमोर ठेवला.
नुकतेच 15 नोव्हेंबर हा दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय जनजाति गौरव दिवस म्हणून यापुढे साजरा होईल अशी घोषणा केली त्यामुळे जनजाति गौरव सप्ताह संपूर्ण राष्ट्रात साजरा होईल व त्या निमित्ताने समाजातील सर्व घटकांनी बिरसा मुंडा जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून जनजाति क्रांतिवीर व त्यांचे बलीदान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे व ‘एक दिया बिरसा के नाम’ उपक्रम सर्व घराघरांतून साजरा करावा असे मत महिला सहप्रमुख एडवोकेट जास्वंदी भंडारी यांनी व्यक्त केले.

यावेळी कल्याण आश्रमाचे ॲड चित्रा आचार्य ,सचिव काशीराम बारेला, ॲड जयश्री देशमुख, श्री मधुकर वाणी ॲड. वैशाली चौधरी, वीरसिंग वसावे ,ॲड. निलेश भंडारी ठाकूर समाजाचे सर्व बांधव व नागरिक उपस्थित होते.