खंडाळा ग्रामसेवकाची उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार ;


खंडाळा ता. भुसावळ (वार्ताहर) – खंडाळा ग्रामसेवक यांच्याकडे ग्रामसभेची व मासिक सभेच्या प्रोसिडिंग ची झेरॉक्स मागणी तोंडी व लेखी करून सुद्धा ग्रामपंचायत सदस्य यांना देत नसल्यामुळे या ग्रामसेवकाची उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रामपंचायत विभाग) यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंद सुरवाडे यांनी कारवाईसाठी लेखी तक्रार करून निवेदन दिले आहे
सविस्तर असे की खंडाळा ग्रामपंचायत ग्रामसेवक (अतिरिक्त पदभार) राहुल तायडे यांना दिनांक 1-9 -2021 परोजी ग्रामसभा घेतली परंतु गावात याबाबत कोणतीही दवंडी किंवा भिंती पत्रक चिटकवलेले नाही आणि ग्रामसभेत मध्ये कोणकोणते विषय घेतले याचीसुद्धा कल्पना मला दिलेली नाही म्हणून मी ग्रामसेवक यांना 1-9 -2021 पासून 29- 10- 21 पर्यंत ग्रामसभेची प्रोसिडिंग ची मागणी केलेली आहे परंतु यांनी मला त्या प्रोसिडिंग ची नकल अद्याप पर्यंत दिलेली नाही म्हणजे यांनी या ग्रामसभेत माझ्या व माझ्या दलित समाजाविरुद्ध काही ठराव घेतलेला आहे का..? मग हे नक्कल का देत नाही म्हणून मी यांना 29 -10 -21 रोजी मासिक मीटिंग च्या दिवशी लेखी अर्ज दिलेला आहे व त्यात ग्रामसभा व एप्रिल 2021 ते ऑगस्ट 2021 ला झालेल्या मिटिंगचा संपूर्ण नकला ची लेखी मागणी केलेली आहे. त्यादिवशी चार वाजेपर्यंत मला सहीशिक्क्यानिशी संपूर्ण नकला मिळाव्यात असा अर्ज देऊन सुद्धा ग्रामसेवक यांनी दहा दिवसांचा कालावधी उलटून सुद्धा अद्याप मला नकला दिलेल्या नाही आणि त्या ग्रामसभेत यांनी काही दलित समाजातील समाजकंटकांच्या सुद्धा सह्या घेतलेल्या असतील म्हणून एक दलित सदस्याला अंधारात ठेवून लपवाछपवी करून काहीतरी दलित सदस्य व दलित समाजावर अन्याय करण्यासारखा प्रकार असल्याचे समजते म्हणून माझा ग्रामपंचायत सदस्य या नात्याने या ग्रामसभेत विरोध राहील म्हणून ग्रामसेवक राहुल तायडे हे ग्रामसभेच्या व मासिक सभेच्या नकला देत नाही. म्हणून यांच्यावर आपल्या स्तरावर कायद्याची कारवाई करण्यात यावी ही विनंती असे निवेदन ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंद सुरवाडे यांनी (ग्रामपंचायत विभाग) उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारीचे निवेदन दिले आहे