शिवसेनेचे खंदे समर्थक इलियास शेख यांच्यातर्फे फैजपुर येथे मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण ; जनतेची सेवा हिच खरी धर्म सेवा- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज आणि मौलाना अनस साहेब यांचे प्रतिपादन ;

फैजपुर : फैजपूर येथे गरजु रुग्णांना वेळेवर हाॅस्पिटमधे पोहोचण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या मदत व्हावी म्हणुन ऑक्सिजन सुविधा युक्त रुग्णवाहिका दान करण्यात आली आहे . हि रुग्ण वाहिका शिवसेनेचे अंगिकृत अल्पसंख्यांक आघाडी संघटना तथा शिक्षक सेनेचे इलयास असगर शेख व त्यांच्या पत्नी सौ. मेहेर निगार शेख यांच्या तर्फे त्यांच्या स्वर्गीय आई वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ देण्यात आली आहे .
फैजपुर येथील सुभाष चौक येथे सर्व धर्माचें धर्म गुरु यांच्या उपस्थीतीत रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रम घेण्यात आला असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना ताहेर पटेल व प्रमुख अतिथी म्हणून फैजपूर येथील सतपंथ संस्थान चे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज हे उपस्थीत होते.तर प्रमुख पाहुणे म्हणुन मौलाना फतेह मोहम्मद , मौलाना अनस,मौलाना शौकत फलाही , मौलाना नोमान , नगरसेवक केतन किरंगे , गटनेते कलीम खान मन्यार , इर्फान मेम्बर ,सय्यद असगर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचा उद्देश इलयास शेख यांनी मांडला तर महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज आणि मौलाना अनस यांनी लोकांची सेवा हिच खरी धर्म सेवा या विषयावर आपले विचार मांडले तर सुत्र संचालन कौसर शेख सर यांनी केले.
फैजपुर चे सर्वात ज्येष्ठ मौलाना फतेह मोहम्मद आणि सतपंथ संस्थान फैजपूरचे गादिपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते हिरवी झंडी दाखऊन रुग्ण वाहिका रवाना करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मौलाना ताहेर पटेल यांच्या अध्यक्षीय भाषणा नंतर कायक्रमाचे समापन झाले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी कामील शेख , शरिफ शेख ,अखतर पहेलवान,असिफ शेख,साबीर शेख आदिंनी परिश्रम घेतले .