सर्वोदय हायस्कुल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ;

भुसावळ – तालुक्यातील किन्ही येथील सर्वोदय हायस्कुल मध्ये आजरोजी दुपारी ग्रामपंचतीच्या वतीने गुणवंत विद्यार्थी,कोरोना योद्धा व प्रगतशील शेतकरी यांचा सत्कार समारंभ करण्यात आला .

सविस्तर वृत्त असे की, दिनांक १३/११/२०२१ रोजी दुपारी ०१:०० वाजेच्या दरम्यान ग्रामपंचायतीच्या वतीने मा.खासदार रक्षाताई खडसे व आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थित १० वी १२ उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी,कोरोना योद्धा व प्रगतशील शेतकरी यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच दिव्यागांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ५% निधी उपलब्ध करून सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाला खासदार रक्षाताई खडसे,आमदार संजय सावकारे,सुरेशदादा येवले,वंदना उन्हाळे,प्रीती पाटील,सुनील महाजन,राजेंद्र चौधरी,भालचंद्र चौधरी, अनिल पाटील, निलम सोनवणे, जयंत पाटील, संदीप निकम अशांची उपस्थिती होती.