भुसावळ -रेल्वे मंत्रालयाने भुसावळ -खंडवा, बडनेरा- नरखेड, नागपूर – आमला, आमला- इटारसी, अमरावती -बडनेरा आणि आमला – छिंदवाडा दरम्यान पुढील सुचनेपर्यंत दैनिक अनारक्षित रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व अनारक्षित मेमू ८ डब्ब्यांसह चालविण्यात येतील. तपशील खालीलप्रमाणे-

१. भुसावळ- इटारसी
ट्रेन क्रमांक 01183 अनारक्षित दि. १५.११.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत भुसावळ येथून दररोज २०.४० वाजता सुटेल आणि इटारसी येथे दुसर्या दिवशी ०६.०५ वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01184 अनारक्षित दि. १९.११.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत इटारसी येथून दररोज १९.३० वाजता सुटेल आणि भुसावळ येथे दुसऱ्या दिवशी ०४.२५ वाजता पोहोचेल.
थांबे: सावदा, निंभोरा, रावेर, वाघोडा, बुर्हाणपूर, नेपानगर, सागफाटा, डोंगरगाव, बारगाव गुजर, खंडवा, माथेळा, तळवड्या, सुरगाव बंजारी, चरखेरा खुर्द, चनेर, बारूड, डागर खेडी, खिरकीया, भिरिंगी, मासनगांव, पलसनेर, हरदा, चरखेरा, तिमरनी, पगडल, भैरोनपूर, बानापुरा, धरमकुंडी आणि दुलारिया
२. भुसावळ-बडनेरा
ट्रेन क्रमांक 01365 अनारक्षित दि. १५.११.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत भुसावळ येथून दररोज ०६.३० वाजता सुटेल आणि बडनेरा येथे त्याच दिवशी ११.३५ वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01366 अनारक्षित दि. १७.११.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत बडनेरा येथून दररोज १३.३० वाजता सुटेल आणि भुसावळ येथे त्याच दिवशी १८.५५ वाजता पोहोचेल.
थांबे: वरणगाव, आचेगाव, बोदवड, कोल्हाडी, खामखेड, मलकापूर, वडोदा, बिस्वा ब्रिज, खुमगाव बुर्ती, नंदुरा, जलंब, शेगाव, श्रीक्षेत्र नागझरी, पारस, गायगाव, अकोला, येउलखेड, बोरगाव, काटेपूर्णा, मुर्तजापूर, माना, कुरम आणि टाकळी (फक्त 01366 साठी).
३. बडनेरा-नरखेड
ट्रेन क्रमांक 01367 अनारक्षित दि. १५.११.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत बडनेरा येथून दररोज १३.०५ वाजता सुटेल आणि नरखेड येथे त्याच दिवशी १६.१५ वाजता पोहोचेल.
ट्रेन क्र. 01368 अनारक्षित दि. १५.११.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत दररोज १७.०० वाजता नरखेड येथून सुटेल आणि बडनेरा येथे त्याच दिवशी २०.३५ वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01369 अनारक्षित दि. १६.११.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत बडनेरा येथून दररोज ०५.५० वाजता सुटेल आणि नरखेड येथे त्याच दिवशी रात्री ०८.५५ वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01370 अनारक्षित दि. १६.११.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत नरखेड येथून दररोज ०९.३० वाजता सुटेल आणि बडनेरा येथे १३.०० वाजता पोहोचेल.
थांबे: नवीन अमरावती, वळगाव, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड ऑरेंज सिटी, पुसला आणि मोवाड.
४. नागपूर- आमला
ट्रेन क्रमांक 01323 अनारक्षित दि. १८.११.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत नागपूर येथून दररोज १८.०५ वाजता सुटेल आणि आमला येथे त्याच दिवशी २२.२० वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01324 अनारक्षित दि. १८.११.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत आमला येथून दररोज ०४.३० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी ०९.१० वाजता पोहोचेल.
थांबे: गोधनी, भरतवाडा, कळमेश्वर, कोहली, सोनखांब, मेटपांजरा, काटोल, कळंभा, तिनखेडा, नरखेड, दारीमेटा (फक्त 01323 साठी), पांढुर्णा, तीगांव, घुडनखापा (फक्त 01323 साठी), चिचोंडा, हतनापुर, मुलताई आणि जौलखैरा.
५. आमला-इटारसी
ट्रेन क्रमांक 01317 अनारक्षित दि. १९.११.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत आमला येथून दररोज ०८.०० वाजता सुटेल आणि इटारसी येथे त्याच दिवशी ११.३५ वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01318 अनारक्षित दि. १६.११.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत इटारसी येथून १२.२० वाजता सुटेल आणि आमला येथे त्याच दिवशी १६.०० वाजता पोहोचेल.
थांबे: बरसाली, मलकापूर रोड, बैतूल, मरमझिरी, घोराडोंगरी, बरबतपूर, ढोढरामोहर, काला आखर, टाकू आणि किरतगढ़.
६. अमरावती- वर्धा
ट्रेन क्रमांक 01371 अनारक्षित दि. १६.११.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत अमरावती येथून दररोज १५.१५ वाजता सुटेल आणि वर्धा येथे त्याच दिवशी १७.१० वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01372 अनारक्षित दि. १७.११.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत वर्धा येथून दररोज १०.०० वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी १२.१० वाजता पोहोचेल.
थांबे: टिमटाळा, मालखेड, चांदूर, धामणगाव, तळणी, पुलगाव, कवठा आणि दहेगाव.
७. आमला -छिंदवाडा
ट्रेन क्रमांक 01319 अनारक्षित दि. १७.११.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत आमला येथून दररोज ०८.०० वाजता सुटेल आणि छिंदवाडा येथे त्याच दिवशी ११.१५ वाजता छिंदवाडा येथे पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01320 अनारक्षित दि. १७.११.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत छिंदवाडा येथून १८.१५ वाजता सुटेल आणि आमला येथे त्याच दिवशी २१.२० वाजता पोहोचेल.
थांबे: जांबरा, बोरढाई, नवागाव, हिरदागढ, जुन्नारदेव, पालाचौरी, इकलेहरा आणि परासिया.
८. बडनेरा-अमरावती
ट्रेन क्रमांक 01379 अनारक्षित दि. १६.११.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत बडनेरा येथून दररोज १४.१० वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी १४.३० वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01380 अनारक्षित दि. १७.११.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत अमरावती येथून १३.१० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १३.२५ वाजता बडनेरा येथे पोहोचेल.
नियमित क्रमांकासह ट्रेन्स चालवण्यासाठी रेल्वे माहिती प्रणाली केंद्र (CRIS- Centre for Railway Information System) सिस्टम अपडेट करत आहे.
प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे, एसओपी चे पालन करावे.


