१४ वर्षआतील व १७ वर्षातील सब- ज्युनिअर गटासाठी रविवारी भुसावळला टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी ;

भुसावळ :-महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची ८ वी १४ वर्षाच्या आतील व १९ वी १७ वर्षातील (सब- जुनियर) गटातील मुले/ मुलींची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा कोल्हापूर येथे १८ ते २० नोव्हेंबर २०२१ दरम्यान होणार आहे़, सदर स्पर्धेकरिता जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंची निवड चाचणी रविवारी १४ रोजी नाहाटा महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी १२ वाजता होणार आहे.

१४ वर्षासाठी ३० नोव्हेंबर २००७ व १७ वर्षासाठी ३० नोव्हेंबर २००४ नंतर व जन्मलेल्या खेळाडूंनी क्रिकेटच्या गणवेशात स्वतःची बॅट घेऊन निवड चाचणीस उपस्थित राहावे ,अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव वासेफ पटेल, राहुल कोळी,प्रतिक कुलकर्णी, विकास पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रा आनंद उपाध्याय, गोपाल जोनवाल, श्याम भारंबे यांनी केले आहे .