भुसावळात आयजी पथकाची कारवाई : गावठी कट्टा व मॅगझीनसह दोघे ताब्यात :

भुसावळ – शहरातील इदगाह रोडवरील हिरा हॉल जवळ गावठी कट्टा व अग्निशस्त्र (पिस्टल ) मॅगझीन सह दोघांना मुद्देमालासह आइजी पथकाने केलेल्या कारवाईत हस्तगत केले .
पोलीस उपमहानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांचे विशेष पथकातील काम करणारे पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे अंमलदार यांनी गुरुवार दिनांक ११ रोजी ०६:५० वाजेच्या दरम्यान इदगाह रोडवर हिल केेलेल्यां काऱवाइत शेख ताहेर शेख आझाद वय २१ वर्ष राहणार मुस्लिम कॉलनी,इदगाह जवळ भुसावळ व शेख रिजवान शेख इलियास वय २० वर्ष राहणार मुस्लिम नगर भुसावळ यांना संगनमताने अंदाजे २५,०००/ रुपये किमतीचे विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचे अग्निशस्त्र (पिस्टल ) मॅगझीन विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगतांना पकडले . त्यांचे जवळ १५,०००/रुपये किमतीचे दोन मोबाईल व ४५,०००/रुपये किमतीची एक रिक्षा असा एकूण ८५,००० /-हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांचे जवळ मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ व ७/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई डॉ.बी.जी.शेखर पाटील पोलीस उपमहानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बापू रोहोम,सपोनि सचिन जाधव,ए.एस.आय.बशीर गुलाब तडवी,पोहेकॉ रामचंद्र बोरसे, पोना मनोज दुसाने,नितीन सपकाळे,प्रमोद मंडलिक,चालक पोकॉ सुरेश टोंगारे अशांनी मिळून केली. या करवाईमुळे शहरातील गुन्हेगारांवर चांगलीच चपराक बसली आहे .