साकेगाव येथे रस्ता कॉंक्रिटीकरणास प्रारंभ ;माजी सरपंच अनिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न;


साकेगाव – स्मार्ट विलेज ग्रामपंचायत प्रशासन साकेगावच्या वतीने पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायत समोरील रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे माजी सरपंच अनिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.
प्रसंगी उपसरपंच आनंद ठाकरे, माजी सरपंच सुरेश पाटील , ग्रामपंचायत सदस्य गजानन पवार , गजानन कोळी, समाधान कोळी ,ठेकेदार पप्पू पटेल, ग्रामस्थांची उपस्थिती होती.
ग्रामपंचायतीकडे येणारा प्रमुख रस्ता साबीर पटेल यांच्या घरापासून तर ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत काँक्रीटीकरण कामाला सुरुवात करण्यात आलेली असून गावात जागोजागी ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून काँक्रिटीकरण व पेव्हर ब्लॉकचे कामे पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत करण्यात येत आहे ज्या ठिकाणचे रस्ते व गल्लीबोळ बाकी आहेत असे उर्वरित कामे देखील लवकरच मार्गी लागतील व संपूर्ण गाव सुंदर सुशोभित निर्माण होईल असा विश्वास ग्रामपंचायत प्रशासनाने व्यक्त केलेला आहे सदरच्या काँक्रिटीकरण कामासंदर्भात ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्याबद्दल आनंद व्यक्त केलेला आहे