महर्षी वाल्मिक जयंती निमित्ताने दत्त नगर,श्री राम नगर परिसरातील नागरिकांना कोरोना वॅक्सिंन ;श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचा स्तुत्य उपक्रम ;

भुसावळ – महर्षी वाल्मिक जयंती निमित्ताने दत्त नगर,श्री राम नगर परिसरात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने खान्देश अध्यक्ष निखिल राजपूत यांनी आज दिनांक 20/10/21 रोजी
परिसरातील नागरिकांना कोरोना वर मात करण्यासाठी कोविड शिल्ड,कोवॅक्सिंन ही लस (डोस )घर बसल्या उपलब्ध करून दिली.
दवाखान्यात जाऊन सुद्धा तेथे गर्दीत नंबर लावणे , लसीकरण करणे , नागरिकांच्या मोबाईल वर लवकर मेसेज न येणे , नागरिकांच्या वारंवार होणाऱ्या चकरा वाचल्या
या परिसरातील नागरिकांनी लसीकरण करून घेतले परिसरातील नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले नागरिकांनी सम्पूर्ण करणी सेनेचे आभार व्यक्त केले. प्रसंगी करणी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत,आनंदा पाटील, दलजीत चौधरी,किरण राजपूत,महेश महाजन,निलेश ठाकूर,समाधान महाजन,अक्षय न्हावकर, शुभम गुंजाळ,चेतन पाटील,सोनू राजपूत,विशाल राजपूत,भूषण राजपूत,गोलू कोल्हे व असंख्य नागरिक उपस्थित होते .