भुसावळ : शहरातील एका भागात राहणार्या 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी दोन संशयीतांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील एका भागात 35 वर्षीय महिला आपल्या आईकडेच तीन मुलींसह राहते. या महिलेच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला नात्याने मावसभाऊ असलेल्या तरुणासह अन्य एका तरुणाने पळवून नेल्याची घटना 29 रोजी रात्री घडली. जाताना संशयीत घरातील बॅगेतून अडीच लाख रुपये घेवून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. बाजारपेठ पोलिसांनी या अनुषंगाने गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे.



