भुसावळ- शहरातील रणजितसिंग राजपूत ह्यांना कुरुक्षेत्र, हरियाणा येथे राष्ट्रीय सामाजिक संघटनेच्या वतीने “राष्ट्रीय युवा सन्मान” देऊन गौरविण्यात आले पुरस्काराचे वितरण हरियाणा चे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर ह्यांचे ओएसडी व प्रतिष्ठित लोकसंगीत कलाकार गजेंद्र फोगाट व हरियाणा युवा आयोगाचे अध्यक्ष मुकेश गौड ह्यांच्या हस्ते कुरुक्षेत्र येथील कला भवनात करण्यात आले ह्यावेळी हरियाना कला परिषदेचे अध्यक्ष प्रा. संजय भसीन तसेच नुकताच टोकियो ओलंपिक मध्ये पदक विजेता व आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू सुरेंद्र कुमार व राष्ट्रीय सामाजिक संघटन चे चेअरमन जीतेंद्र नरवाल व प्रदीप मेहला उपस्थित होते.

रणजितसिंग राजपूत ह्याला नुकताच युवक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवकाला केंद्र स्तरावर दिला जाणारा राष्ट्रीय युवा पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे. राजपूत ह्यांनी शहरात भारत सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करत स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, मतदान जनजागृती विविध सामाजिक कार्यात सक्रिय रित्या कार्य केल्यामुळे ह्या संपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे भुसावळ शहरात अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले आहेत भुसावळ शहरातील स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये त्यांनी स्वच्छतादूत म्हणून महत्वाची भूमिका बजावली तर श्रमदानातून त्यांनी खडका किन्ही शिवार व चोरवड नाला बांध बांधून जलसंवर्धन केले आहे मतदान जनजागृती मध्ये दिव्यांग व वयोवृद्ध व्यक्तींना मतदान करण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका राबविली आहे ह्यापूर्वी त्यांना जागतिक स्तरावर ‘ग्लोबल लिडर’ अवार्ड केंद्र सरकारच्या जलसंधारण मंत्रालय तर्फे ‘वॉटर हिरो’ स्वच्छ भारत अभियान मध्ये जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत ह्यांच्या तर्फे स्वच्छ भारत समर इंटर्नशिप मध्ये प्रथम पुरस्कार, ‘राष्ट्रीय युवा गौरव’ अश्या विविध पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे.
हरियाणातील कार्यक्रमात आपण कसे घडलो ह्या बद्दल केले युवकांना संबोधित
युवक क्षेत्रात कार्य करीत असतांना एका छोट्याशा शहरापासून केलेल्या कार्याची दखल हे केंद्र स्तरापर्यंत कश्या प्रकारे पोहचते ह्या संपूर्ण कार्याचा प्रवास युवकांसमोर राजपूत ह्यांनी मांडला
श्री कृष्णाच्या पदस्पर्शाने पावन कुरुक्षेत्र हरियाना च्या भूमीवर मला माझा जीवनप्रवास मांडण्याची संधी राष्ट्रीय सामाजिक संघटनेच्या वतीने मिळाली तसेच राष्ट्रीय युवा सन्मान देऊन गौरविण्यात देखील आले ह्याचा मला खूप आनंद होत आहे
रणजितसिंग राजपूत
(राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी, युवक कल्याण एवं क्रीडा मंत्रालय भारत सरकार)


