मोटार सायकल चोरी करणारे दोघे अट्टल गुन्हेगार यांच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी आवळ्ल्या मुसक्या : 5 लाख 15 हजार रुपये किंमतीच्या 19 मोटार सायकल केल्या जप्त : स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांची कारवाई:


जळगाव –
मोटार सायकल चोरी करुन लोकांकडे गहाण ठेवून त्याचे कडून पैसे घेणारे अट्टल मोटार7 सायकल चोरी करणारे आरोपी आरीफ तडवी व चेतन चव्हाण यांच्या स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी मुसकया आवळ्ल्या .
मागील वर्षा भरा पासून मोटार सायकल चोरीचे सत्र सुरुच असल्याने मोटार सायकल चोरी करणार आरोपीतांचा शोध
.पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे ,
अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी ,चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे
यांनी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले , यांना आदेश दिले होते. त्यावरून पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे चे
सफौ. अशोक महाजन , सफौ. रवि नरवाडे , पो.हे.कॉ महेश महाजन , पो.ना किशोर राठोड , पो.ना रणजित जाधव, पो.ना श्रीकृष्ण देशमुख , पो.कॉ विनोद पाटील , पो.कॉ उमेशगीरी गोसावी , पो.कॉ ईश्वर पाटील , पो.कॉ हेमंत पाटील, चा.पो.हे.कॉ दिपक चौधरी , चा.पो.ना मुरलीधर बारी , चा.पो.ना अशोक पाटील सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना नेमण्यात आले .
. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, आरीफ शरिफ तडवी (वय 24 ) रा.गणेश नगर पहूर हा मोटार सायकल चोरी करीत आहे . त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी
नेमलेला पथकास आदेश दिले की
तेथे जावून त्याची खात्री करा व त्यास ताब्यात घेवुन पुढील योग्य ती कारवाई करा त्यावरून नेमलेल्या पथकाने त्याचा पहूर येथे शोध घेत असता तो जामनेर पहूर रोडवर मोटार सायकल सह मिळून आल्याने त्यास सदर मोटर सायकल बाबत विचारपूस करता तो उडवा उडवीचे उत्तर देवू लागला व त्याचे कडेस सदर मोटर सायकलचे कागदपत्र नसल्याने त्यास विचारपूस केली असता त्याने सदरची मोटर सायकल त्याने व चेतन संजय चव्हाण वय 23 रा.लोहारा ता.पाचोरा अश्यांनी मिळून चोरी केल्याचे कबुली दिली. त्यावरून आरिफ शरिफ तडवी व चेतन संजय चव्हाण यांच्या मुसक्या आवळून
त्यांचे कडून 5,लाख 15 हजार /-रुपये किंमतीच्या 19 मोटार सायकल जप्त केल्या . स्थाकिन गुन्हे शाखा जळगाव यांना यश आले.

आरोपीतांन कडुन स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना जळगाव जिल्हायातील पाचोरा पोलीस .स्टेशनचे 1) गु.र.न 292/2020
2) गु.र.न 14/2021 , 3) गु.र.न 61/2021
4) गु.र.न 141/2021 , 5) गु.र.न 153/2021
6) गु.र.न 162/2021, 7) गु.र.न 223/2021
8) गु.र.न 334/2021, गुन्हे उघडीस आणले तसेचजळगाव MIDC पो.स्टे चे ) गु.र.न 90/2021
2) गु.र.न 614 /2021
3) गु.र.न 646/2021जामनेर पो.स्टेचे गुु .र न 26/2021
2) गु.र.न 340/2021पिपळगाव हरेश्वर पो.स्टे 1) गु.र.न 229/2020
2) गु.र.न 274/2021 व पहुर पो.स्टे 1) गु.र.न 259/2020 य्या

गुह्यांचा समावेश आहे