भुसावळ : पशू रक्षा व शाकाहाराबाबत गेल्या 30 वर्षांपासून भारतीय शाकाहार संघातर्फे काम सुरू असून या संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी भुसावळातील युवा कार्यकर्ते चेतन जैन यांची नियुक्ती करण्यात आली. शाकाहार संघाचे राष्ट्रीय संयोजक रमेश तोरावत जैन यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय शाकाहार संघातर्फे अनेक कत्तलखाने बंद करण्यात आले असून नागरीकांना शाकाहारकडे वळवण्यात आले आहे. पशू हत्या रोखण्यासाठी प्रयत्न करण्यासह शाकाहाराबाबत अधिक जनजागृती करण्यावर भर देण्यात येईल, असे नियुक्तीनंतर चेतन जैन यांनी सांगितले.



