भुसावळ – शेतकऱ्यांचे दैवत व मित्र सर्जाराजाचा सण म्हणजे बैल पोळा .भुसावळ शहर व तालुक्यात शेतकरी बांधवांनी आज मोठ्या आनंदाने व उत्साहात बैलपोळा साजरा केला .
श्रावण शुद्ध पिठोरी अमावस्या या दिवशी सर्व शेतकरी बांधव त्यांच्या शेतात वर्षेभर राबून त्यांना साथ देणार्या सर्जाराजाचे (बैलांचे) पूजन करतात. पहाटे बैलाना आंघोळ घालून नवीन झूल पाघरुन , शिंगे रंगवतात व त्यांचा साजश्रुंगार करतात . बैलांचे विधीवत पूजन करण्यात येते. सवाष्ण महिला बैलांचे औक्षण करून त्यांना खास पूरणपोळी, गव्हाची खीर असा गोडाधोडाचा नैवद्य भरवतात. शेतकरी बांधवाच्या प्रत्येक घरी पोळा सण जणू दिवाळीच असते .
शहरासह ग्रामीण भागात बैलांची मिरवणूक काढली जाते .तालुक्यातील वराडसिम येथे बैलपोळा सणाचा सुुुमारे 200वर्षाचा इतिहास आहे परंतु यंदा कोरोनाचे पार्श्वभूमिवर मिरवणुकीस बंदी असल्याने वराडसिममध्ये व तालुक्यात घराघरात सण उत्साहाने साजरा करण्यात आला .
तालुक्यातिल साकरी येथील शेतकरी बांधव किरण चोपडे यांच्या घरी (बैल) दैवताची पुजा करण्यात आली प्रसंगी सौ वैशाली किरण चोपडे यांनी सर्ज़ाराजाचे औक्षण करून पुरणपोळीचा नैवद्य दिला .



