साकेगाव जोगलखेडा रस्त्याचे जिल्हा परिषद निधीतील काम अतिशय निकृष्ट दर्जाचे – चौकशी व कार्यवाहीची मागणी

भुसावळ – जोगलखेडा भानखेडा साकेगाव रस्त्यासाठी जिल्हा परिषदेतून अंदाजित 32 लक्ष रुपयांचा रस्ता मंजूर झालेला असून रस्त्याचे काम सुरू असून संपूर्ण खडी व माती वेगळी होऊन रस्त्यावर विखुरल्या मुळे रस्त्याचे काम अगदी निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे
याबाबत अधिक माहिती अशी की साकेगाव जोगलखेडा भानखेडा
रस्त्यासाठी जिल्हा परिषदेतुन अंदाजित 32 लक्ष रुपयांचा रस्ता
मंजूर असून या रस्त्याच्या कामात वापरलेली खडी व माती पूर्णपणे उघडी पडल्यामुळे संपूर्ण रस्त्यावर खडीचा सडा पडलेला दिसत आहे प्रशासनाच्या लाखो रुपयांचा निधी जनतेच्या सेवेसाठी येत असतो मात्र त्या पैशाचा उपयोग काही राजकीय पुढारी तसेच ठेकेदार व एजन्सी धारक मिळून विनियोग जर करत असतील व जनतेच्या पैशांची लूट करत असतील अशा वेळेला अधिकारी वर्गाने कठोर भूमिका घेऊन चौकशी करून बोगस एजन्सी धारकांना व त्यांच्या मालकांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे व त्यांना पुन्हा काम मिळणार नाही असा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरत आहे तसेच साकेगाव जोगलखेडा भानखेडा रस्त्याचे काम निकृष्ट झाल्यामुळे एका पुढाऱ्याच्या वरदहस्तामुळे
ग्रामस्थ कुजबूज करीत असून स्पष्ट बोलण्यासाठी कोणीही धजत नसल्याचे दिसत आहे मात्र याबाबत काही शेतकरी बांधवांनी व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन रस्त्याच्या चौकशी व कार्यवाही बाबत एक निवेदनाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी साहेब तसेच संबंधित मंत्र्यांना पाठवलेली आहे