भुसावळ –
तालुक्यातील शिवपूर कन्हाळा या गावी तालुका पोलिसांनी अवैध गावठी दारू भट्ट्याविरुद्ध वॉश आऊट मोहीम राबविली असून तीन ठिकाणच्या अवैध दारू भट्ट्या उद्ध्वस्त करीत 3400 लीटर रसायन नष्ट करून सुमारे एक लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे .
शिवपूर कन्हाळा या गावी शनिवार ३० जुलै रोजी राबविन्यात असता या मोहिमेत संशयीत गफूर बुधु गवळी याच्या ताब्यात गूळ मोह नवसागर मिश्रित दारू गाळण्याचे कच्चे रसायन 06 ड्रम व तयार गावठी हातभट्टी दारू असा एकूण 38,700 रु माल मिळून आला
तर दुसऱ्या कारवाईत सलीम हसन गवळी याच्या ताब्यात दारू गाळण्याचे 06 ड्रम कच्चे रसायन व तयार दारू असे 38, 250 रुपये असा मुद्देमाल मिळून आला तिसऱ्या कारवाईत संशयीत आरोपी खलील हसन गवळी याच्या ताब्यात दारू गाळण्याचे 05 ड्रम कच्चे रसायन व तयार दारू 32,700 रु मुद्देमाल मिळून आले असा तीघा कडून एकूण 17 ड्रम मध्ये 3400 लीटर कच्चे रसायन व 85 लिटर तयार दारू सह एकूण 1 ,09, 650 रु मुद्देमाल मिळून आला म्हणून त्यांच्या विरुद्ध प्रोव्ही कायदा अन्वये तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .
सदरची कारवाई उप विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार ,सपोनि रुपाली चव्हाण ,पो हे कॉ युनूस इब्राहिम शेख, विठ्ठल फुसे ,रियाज काझी, संदीप बडगे, गणेश राठोड ,जितेंद्र सळूखे, शिवाजी खंडारे ,व पोलीस पाटील ,रेवसिंग पाटील, आणि आरसीपी प्लाटून यांनी केली आहे .



