शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात मृत्यू झालेल्यांचे स्मरणार्थ भुसावळात शिवसेनेतर्फे वृक्षारोपण ;


भुसावळ – शिवसेना पक्षप्रमुख व महाविकास आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त
विनाकारण खर्च टाळून कोरोना काळात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या स्मरणार्थ भुसावळ शिवसेनेतर्फे वृक्षारोपण करुण ट्री गार्ड लावण्यात आले.
वाढदिवसानिमित्त स्थानिक रेल्वे स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून पुतळ्यासमोर शिवसेना पक्षप्रमुख व महाविकास आघाडीचे महाराष्ट्रा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विनाकारण खर्च टाळून कोरोना काळात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या स्मरणार्थ भुसावळ शिवसेनेतर्फे वृक्षारोपण करुन ट्री गार्ड लावण्यात आले.
स्मरण करणाऱ्यांची नावे कै.सुशिलाबाई खरारे, कै. संजीव कोलते, कै. केशव महाजन, एडव्होकेट मतीन अहमद, कै.एडव्होकेट अशोक शिरसाट, कै.हंसराज मगर, पत्रकार कै. विजय घोरपडे, पत्रकार कै.परशुराम धोंडे, पो. हे. का.आनंदा गजरे, पो.का. एजाज पठाण, यांच्या नावाने वृक्षारोपण करण्यात येवून स्मरणार्थ ट्री गार्ड गार्ड लावण्यात आले. य्या रोपांची पालकत्व व संगोपन करण्याची जबाबदारी कट्टर शिवसैनिक तथा शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत शर्मा (नमा) यांनी घेतली आहे
याप्रसंगी उपस्थित शिवसेना माजी जिल्हाप्रमुख जगदीश जी कापडे, शिवसेना शहर प्रमुख निलेश महाजन, नगरसेवक मुकेश गुंजाळ, उपशहर प्रमुख राकेश खरारे, जाकीर पेंटर, नाना मोरे, अरुण साळुंखे, मधुकरराव हिंगणे, धीरज वाढोनकर, प्रमोद पाटील, समीर तडवी, विवेक राजपूत, शिवाजी दावभट, महेश पवार, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते .